Thursday, July 28, 2011

शिरवळ गावाच्या पश्चिम टोकाला ब्राह्मण आळीच्या शेवटी रामेश्वराच्या रस्त्यावर पूर्वाभिमुख समर्थ रामदास स्वामींचा मठ आहे. शिरवळचा मठ हा खंडाळा तालुक्यातील कन्हेरी या गावातील मठाचा उपमठ.

रामदासी संप्रदायातील पुरुषोत्तमस्वामी यांचे शिष्य असणार्‍या श्रीनारायणस्वामींनी शिरवळला नीरा नदीच्या परिसरात हा उपमठ स्थापला. कन्हेरीच्या शिष्यपरंपरेतील असल्याने शिरवळचा मठ कन्हेरीचा उपमठ म्हणून ओळखला जाऊ लागला.या मठाला काही इनाम जमिनबाब होती,परंतु वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात त्या जमिनी गेल्याने आणि प्रत्यक्ष मठाची वास्तूही गेल्याने सारा प्रश्नच मिटला आहे.या मठापर्यंत पाणी फारसे येत नाही.त्यामुळे देवाच्या नित्यपूजेसाठी शासनाने नाममात्र भाडे घेऊन वास्तू गावकर्‍यांच्या ताब्यात दिली आहे.मठाची देखभाल व पूजाअर्चा मित्रमंडळामार्फत केली जाते.

No comments:

Post a Comment